Job 7:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, तू लोकांवर नजर ठेवतोस. मी पाप केले असले तरी मी आता काय करु शकतो? तू मला तुझे लक्ष्य का बनवत आहेस? मी तुझ्यासाठी एक समस्या बनलो आहे का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे मानवरक्षका! मी पाप केले असले तर त्यात तुझे काय गेले? तू मला आपले निशाण का करून ठेवले आहेस? मी आपणाला भार मात्र झालो आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर मी पाप केले, तर ज्या तुमची नजर लोकांवर लागलेली असते, त्या तुमचे मी काय केले? माझ्यावर नेम धरावा म्हणून तुम्ही मला निशाणा करून का ठेवले आहे? मी तुम्हाला ओझे असे झालो आहे का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू लोकांवर नजर ठेवतोस. मी पाप केले असले तरी मी आता काय करु शकतो? तू मला तुझे लक्ष्य का बनवत आहेस, मी तुझ्यासाठी एक समस्या बनलो आहे का?