Job 7:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू मला माझ्या पापाबद्दल क्षमा का करुन टाकीत नाहीस? मी लवकरच मरेन आणि माझ्या थडग्यात जाईन. तू नंतर माझा शोध घेशील पण मी गेलेला असेन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू माझा अपराध का क्षमा करत नाहीस? माझ्या ठायीचा दोष का घालवत नाहीस? आता तर मी धुळीत पडून राहणार तू माझा पुष्कळ शोध करशील पण मी नसणार.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या अपराधांची क्षमा करून माझ्या पापांची गय का करीत नाही? कारण लवकरच मी धुळीत पडणार आहे, तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी अस्तित्वात नसेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू मला माझ्या घोर अन्यायाची आणि माझा आज्ञाभंगाची क्षमा का करून टाकीत नाहीस? मी आता असाच धुळीत पडून राहणार तू नंतर माझा शोध घेशील पण मी अस्तित्वात नसेल.”