Job 7:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी झोपी जाण्याच्या वेळी विचार करतो उठण्यासाठी किती वेळ आहे याचा आणि रात्र संपतच नाही. सूर्य उगवेपर्यंत मी या कुशीवरुन त्या कुशीवर तळमळत असतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पडलो असता म्हणतो, ‘मी केव्हा उठेन? रात्र केव्हा निघून जाईल?’ दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा तळमळत राहतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी झोपी जाण्याच्या वेळी विचार करतो, ‘उठण्यासाठी अजून किती वेळ आहे?’ रात्र काही संपतच नाही, पहाटेपर्यंत मी तळमळत असतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा मी झोपी जातो, मी स्वतःला म्हणतो? रात्र केव्हा निघून जाईन? आणि केव्हा मी ऊठेन? एकसारखा मी तळमळतो दिवस उजाडेपर्यंत.