Joel 1:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्राणी भुकेन व्याकूळ होऊन कण्हत आहेत. गुरांचे कळप गांगरून जाऊन, इतस्तत: भटकत आहेत. त्यांना खाण्यास चारा नाही. मेंढ्या मरत आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गुरेढोरे कशी धापा टाकत आहे! बैलांचे कळप घाबरले आहेत, कारण त्यांना चारा नाही; मेंढरांचे कळपही पिडले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गुरे कशी कण्हत आहेत! शेरडामेंढरांचे कळप व्याकूळ झाले आहेत, कारण त्यांना चरण्यासाठी कुरणेच नाहीत; मेंढ्यांचे कळप विव्हळत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्राणी कसे कण्हत आहेत! गुरांचे कळप घाबरले आहेत. त्यांना खाण्यास कुरणे नाहीत. मेंढ्यांचे कळपसुद्धा पीडले आहेत.