Joel 1:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नेत्यांनो, हा संदेश ऐका! ह्या देशात राहणाऱ्या सर्व लोकानो, माझे ऐका! तुमच्या आयुष्यात पूर्वी, असे काही घडले आहे का? नाही. तुमच्या वडिलांच्या काळात असे काही घडले का? नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहो वृद्धांनो, हे ऐका; देशातील सर्व रहिवाशांनो कान द्या. तुमच्या काळात अथवा तुमच्या वाडवडिलांच्या काळात अशी गोष्ट कधी घडली होती काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वडिलजनहो, हे ऐका; या देशात राहणारे प्रत्येकजण हे ऐको. तुमच्या दिवसात किंवा तुमच्या पूर्वजांच्या दिवसात असे कधी घडले होते काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो वडिलांनो, हे ऐका, आणि देशात राहणाऱ्या तुम्ही सर्वांनी कान द्या. तुमच्या पूर्वजांच्या दिवसात किंवा तुमच्या दिवसात पूर्वी कधी असे हे घडले काय?