Joel 2:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सियोन वरुन रणशिंग फुंका! माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने इषारा द्या. ह्या देशात राहणाऱ्या लोकांचा भीतीने थरकाप उडू द्या. परमेश्वराचा खास दिवस येत आहे. परमेश्वराचा खास दिवस अगदी जवळ आला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सीयोनात कर्णा वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा; देशात राहणारे सर्व थरथर कापोत, कारण, परमेश्वराचा दिवस येत आहे, तो येऊन ठेपला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सीयोनात कर्णा वाजवा; माझ्या पवित्र पर्वतावर धोक्याची घंटा वाजवा. देशात राहणार्‍या प्रत्येकाचा भीतीने थरकाप होवो, कारण याहवेहचा दिवस येत आहे. तो अगदी हाताशी आहे—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सियोनात कर्णा फुंका, आणि माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने गजर करा! या देशात राहणाऱ्यांचा भीतीने थरकाप उडू द्या, कारण परमेश्वराचा दिवस येत आहे; खरोखर, तो जवळ आहे.