Joel 2:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमचे कपडे फाडू नका, तर ह्रदये फाडा” परमेश्वराकडे, तुमच्या परमेश्वराकडे परत या. तो कृपाळू व दयाळू आहे. तो शीघ्रकोपी नाही. तो खूप प्रेमळ आहे. त्याने योजलेली कडक शिक्षा कदाचित् तो बदलेलही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमची वस्त्रे फाडून नव्हे, तर तुमचे अंतःकरण फाडा. याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत या, कारण ते कृपाळू व दयाळू आहेत. ते मंदक्रोध आणि अधिक प्रीती करणारे आहेत, आणि ते विपत्तीविषयी अनुताप करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तुम्ही आपले कपडेच फाडू नका, तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याकडे वळा, कारण तो कृपाळू व दयाळू आहे, तो रागावण्यास मंद आणि विपुल प्रेम करणारा आहे, आणि त्याने लादलेल्या शिक्षेपासून तो मागे फिरेल.