Joel 2:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कदाचित परमेश्वराचे मन: परिवर्तन होईलही, कोणी सांगावे! आणि कदीचित तो त्याच्या मागे तुमच्यासाठी आशीर्वादही ठेवून जाईल. मग तुम्ही परमेश्वराला. तुमच्या परमेश्वराला, अन्नार्पणे व पेयार्पणे देऊ शकाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर तुमचा देव ह्याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्यामागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे; असे की जेणेकरून तुम्हांला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोण जाणो? याहवेह तुमचे परमेश्वर वळतील व अनुताप करतील आणि तुमच्यासाठी एक आशीर्वाद सोडतील— मग याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही धान्यार्पण व पेयार्पण करू शकाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन आणि कदाचित तो मागे वळेल, आणि त्याच्यामागे आपल्यासाठी आशीर्वादही ठेवून जाईल की, काय कोण जाणे? त्यास अन्नार्पण व पेयार्पण ही देता येतील?