Joel 2:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी उत्तरे कडून आलेल्या लोकांना तुमचा देश सोडायला भाग पाडीन. मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात जायला लावीन. त्यातील काही पूर्व समुद्राकडे जातील. तर काही पश्चिम समुद्राकडे जातील. त्या लोकांनी फारच भयंकर कृत्ये केली आहेत. ते मृतांप्रमाणे व सडलेल्या गोष्टींसारखे होतील. तेथे भयंकर दुर्गधी पसरेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उत्तरेकडून आलेल्यास तुमच्यापासून घालवून रुक्ष व वैराण प्रदेशात हाकून देईन; त्याची आघाडी पूर्व-समुद्रात व पिछाडी पश्चिम-समुद्रात हाकून देईन; त्याचा दुर्गंध, त्याची घाण वर येईल; कारण त्याने उन्मत्तपणाची कृत्ये केली आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी उत्तरेकडील उपद्रवी टोळीस काढून त्यांना तुझ्यापासून दूर नेईन; मी त्यांना होरपळून निघालेला ओसाड प्रदेशात ढकलून देईन; त्याची पूर्वेचा रांग मृत समुद्रात बुडवेन व पश्चिमी रांग भूमध्य समुद्रात बुडवेन. आणि मग त्यांचा दुर्गंध वर जाईल; त्यांचा दर्प वाढत जाईल.” निश्चितच याहवेहने महान कार्य केले आहे!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी उत्तरेकडून हल्ला करणाऱ्यांना तुम्हापासून दूर करीन, आणि मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात घालवून देईन. त्यांची आघाडी पूर्व समुद्रात आणि त्यांची पिछाडी पश्चिम समुद्रात जाईल. त्यांचा दुर्गध चढेल. आणि तेथे वाईट दुर्गंधी पसरेल. मी महान गोष्टी करीन.”