Joel 2:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मी, परमेश्वराने, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठविले. तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले. पण, मी, परमेश्वर, तुमच्या संकटांच्या वर्षाची भरपाई करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतडणारे टोळ ह्यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हांला भरपाई करून देईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मोठे टोळ व तरुण टोळ इतर टोळ व टोळांचे थवे, म्हणजेच माझे मोठे सैन्य जे मी तुमच्यामध्ये पाठवले होते; त्यांनी खाल्लेल्या तुमच्या वर्षांची मी भरपाई करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठवले. तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले. मी, तुमच्या संकटाच्या वर्षाची भरपाई करीन.