John 1:29 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपणांकडे येताना पाहिले. योहान म्हणाला, “पाहा, हा देवाचा कोकरा. जगाचे पाप वाहून नेणारा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुसर्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुसर्या दिवशी येशूंना आपणाकडे येत असताना योहानाने पाहिले आणि तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप वाहून नेणारा परमेश्वराचा कोकरा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसर्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!