John 10:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्याला मजुरी देऊन मेंढरे राखायला ठेवलेले असते तो मेंढपाळापेक्षा निराळा असतो. मजुरीवर मेंढरे राखणारा कळपाचा मालक नसतो. मेंढपाळ हाच कळपाचा मालक असतो. म्हणून मजुरीवर काम करणार माणूस लांडगा येताना पाहून मेंढरे सोडतो आणि पळून जातो. मग लांडगा मेंढरांवर हल्ला करुन त्यांची दाणादाण करतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो मेंढपाळ नसेल व मोलकरी असेल, ज्याची स्वतःची मेंढरे नसतील, तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जाईल आणि मग लांडगा मेंढरांवर झडप घालून त्यांची दाणादाण उडवील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु भाडेकरू, जो मेंढपाळ नाही, तो लांडगा येताना पाहतो व मेंढरे तशीच सोडून पळून जातो, मग तो लांडगा त्या कळपावर हल्ला करतो आणि त्यांची पांगापांग होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो; आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून धरतो त्यांची दाणादाण करतो.