John 10:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूदी लोक येशूच्याभोवती जमा झाले, आणि म्हणाले. “किती दिवस तुम्ही आम्हांला असे गोंधळात ठेवणार आहात? जर तुम्हीच ख्रिस्त असाल तर आम्हांला तसे स्पष्टच सांगा!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
लोकांनी त्याला घेरले व विचारले, “तुम्ही कुठपर्यंत आम्हांला संभ्रमात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल, तर आम्हांला उघडपणे सांगा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यहूद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले, “तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असलात तर आम्हांला उघड सांगा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदी पुढार्यांनी त्यांच्याभोवती गराडा घालून विचारले, “तू आम्हाला अजून किती वेळ संशयात ठेवणार आहेस? तू जर ख्रिस्त असशील, तर तसे आम्हाला स्पष्टपणे सांगून टाक.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून यहूदी लोक त्याच्याभोवती जमले आणि त्यास म्हणाले, “आपण कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हास उघडपणे सांगा.”