John 10:33 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हांला मारीत नाही. परंतु तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्या देवाविरुद्ध आहेत. तुम्ही फक्त मानव आहात, पण स्वत:ला देवासारखेच आहोत असे मानता! आणि म्हणून आम्ही तुम्हांला धोंडमार करुन ठार करीत आहोत!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी त्याला उत्तर दिले, “चांगल्या कृत्यांसाठी आम्ही तुम्हांला दगड मारत नाही, तर दुर्भाषणासाठी! कारण तुम्ही केवळ मानव असून स्वतःला देव म्हणवता.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, “चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हांला दगडमार करत नाही, तर दुर्भाषणासाठी; कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते म्हणाले, “कोणत्याही चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुला दगडमार करीत नाही, तर दुर्भाषण केल्याबद्दल. तू एक सामान्य मानव असूनही, स्वतःला परमेश्वर म्हणवितोस म्हणून आम्ही तुला दगडमार करीत आहोत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदी लोकांनी त्यास उत्तर दिले, “आम्ही चांगल्या कामासाठी तुला दगडमार करीत नाही, पण दुर्भाषणासाठी करतो; कारण तू मनुष्य असून स्वतःला देव म्हणवतोस.”