John 11:31 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा जे यहूदी तिच्या घरात तिचे सांत्वन करीत होते ते, मरीया लगबगीने उठून बाहेर गेली असे पाहून ती कबरेकडे शोक करायला गेली असे समजून तिच्यामागे गेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे लोक मरियेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले आणि ती शोक करायला कबरीकडे जात आहे, असे समजून ते तिच्या मागे गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे यहूदी मरीयेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर, ती कबरेकडे रडायला जात आहे असे समजून ते तिच्यामागे गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे यहूदी लोक मरीयेच्याजवळ घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले, तेव्हा ती शोक करण्यासाठी कबरेकडेच जात आहे असे त्यांना वाटले आणि म्हणून तेही तिच्या पाठीमागे गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा जे यहूदी मरियेबरोबर घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, मरीया घाईघाईने उठून बाहेर जातांना पाहिल्यावर, ती कबरेकडे रडावयास जात आहे असे समजून ते तिच्यामागे गेले.