John 11:39 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशूने म्हटले, “हा दगड काढा.” मार्था म्हणाली, “पण प्रभु, लाजर मरुन चार दिवस झाले आहेत, त्याला आता दुर्गंधी येत असेल.” ती मृत लाजराची बहीण होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने म्हटले, “शिळा बाजूला सारा.” मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभो, एव्हाना दुर्गंधी येत असेल कारण त्याला थडग्यात ठेवून चार दिवस झाले आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूने म्हटले, “धोंड काढा.” त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल; कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू म्हणाले, “धोंड बाजूला काढा.” मृत माणसाची बहीण मार्था म्हणाली, “परंतु प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी सुटली असेल, कारण त्याला तिथे ठेऊन चार दिवस झाले आहेत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने म्हटले, “धोंड काढा.” मृताची बहीण मार्था त्यास म्हणाली, “प्रभूजी, आता त्यास दुर्गंधी येत असेल; कारण त्यास मरून चार दिवस झाले आहेत.”