John 11:56 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते येशूचा शोध करीत राहीले, आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले, “तुम्हाला काय वाटते? तो सणाला येणार नाही काय?’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे असताना एकमेकांना म्हणत होते, “तुम्हांला काय वाटते? तो सणासाठी येणार नाही का?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना म्हणत होते, “तुम्हांला काय वाटते? सणास तो मुळीच येणार नाही का?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंना ते शोधत होते, मंदिराच्या अंगणात उभे राहून ते एकमेकांना विचारीत होते, “तुम्हाला काय वाटते? तो वल्हांडण सणाला येणारच नाही काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ते येशूला शोधित होते व ते परमेश्वराच्या भवनात उभे राहून त्यांनी एकमेकांना म्हणत होते, “तुम्हास काय वाटते? सणास तो मुळीच येणार नाही का?”