John 12:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग येशू वल्हांडण सणाच्या अगोदर सहा दिवस असताना बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यातून उठविले होते तो लाजर तेथे होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ओलांडण सणाच्या सहा दिवस आधी येशू बेथानीस आला. ज्या लाजरला येशूने मेलेल्यांतून उठवले होते, तो तेथे राहत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग येशू वल्हांडणाच्या पूर्वी सहा दिवस बेथानीस आला. जो लाजर मेला होता व ज्याला त्याने मेलेल्यांतून उठवले होते तो तेथे होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वल्हांडण सण सुरू होण्याच्या सहा दिवसापूर्वी, ज्याला येशूंनी मेलेल्यातून उठविले होते तो लाजर जिथे राहत होता त्या बेथानी गावी येशू आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग येशू वल्हांडणाच्या सहा दिवस आधी बेथानीस आला आणि ज्या लाजराला येशूने मरण पावलेल्यातून उठवले होते तो तेथे होता.