John 12:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुम्हांला खरे सांगतो, गव्हाचा दाणा भूमीत पडून मेला नाही, तर एकटाच राहतो, पण तो मेला तर पुष्कळ फळ देतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी तुम्हांला खातरी पूर्वक सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुम्हाला निश्चित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकच दाणा राहतो. परंतु तो मेला तर बहुत पीक देतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुम्हास खरे खरे सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरण पावला नाही, तर तो एकटाच राहतो; आणि मरण पावला तर तो पुष्कळ पीक देतो.