John 12:34 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जमाव म्हणाला, “ख्रिस्त सर्वकाळ राहतो असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे तुम्ही का म्हणता? मनुष्याचा पुत्र कोण आहे?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
लोकांनी त्याला विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील, असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे. तर मग मनुष्याच्या पुत्राला उंच केले गेले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून लोकांनी त्याला विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जमावाने म्हटले, “नियमशास्त्रामधून आम्ही ऐकले आहे की ‘ख्रिस्त सर्वदा राहील, तर मानवपुत्राला उंच केले पाहिजेत’ असे तुम्ही कसे म्हणता? हा ‘मानवपुत्र’ कोण आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांनी त्यास विचारले, ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रांतून ऐकले आहे, तर “मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे” असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?