John 12:38 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यासाठी की, यशया संदेष्टेयाचे वचन पूर्ण व्हावे: “प्रभु, आमच्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे. आणि प्रभूचा हस्तप्रताप कोणास प्रगट झाला आहे?” यशया 53:1
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे ह्यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते, ते पूर्ण व्हावे, ते असे: प्रभो, आम्ही सांगितलेल्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचे सामर्थ्य कोणाला प्रकट झाले आहे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ह्यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे: “प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नेमके हेच भविष्य यशायाह संदेष्ट्याने वर्तविले होते, ते पूर्ण झाले: “प्रभू, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि प्रभूचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असेः “प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रकट झाला आहे?”