John 12:42 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तरीही अधिकाऱ्यातील पुष्कळंानी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परुश्यांमुळे त्यांनी हे पत्करले नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
असे असूनही अधिकाऱ्यांपैकीदेखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तरी पण आपण सभास्थानातून बहिष्कृत होऊ नये म्हणून परुश्यांमुळे ते तसे उघडपणे कबूल करत नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे असूनही अधिकार्‍यांतून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण सभाबहिष्कृत होऊ नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करत नव्हते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच वेळेला पुष्कळांनी आणि पुढार्‍यांपैकी अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतु परूश्यांमुळे ते आपला विश्वास व्यक्त करीत नव्हते. आपण सभागृहातून बहिष्कृत केले जाऊ असे त्यांना भय वाटत होते;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी यहूदी अधिकार्‍यांतूनही पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करीत नव्हते.