John 12:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग तो तेथे आहे हे यहूदीयांतील बऱ्याच जणांना कळले. तेव्हा फक्त येशूसाठीच नव्हे तर ज्याला त्याने मेलेल्यातून उठविले होते त्या लाजराला पाहावे म्हणून ते आले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो तेथे आहे, असे पुष्कळ यहुदी लोकांना कळले आणि केवळ येशूकरता नव्हे, तर ज्या लाजरला त्याने मेलेल्यांतून उठवले होते, त्याला पाहण्याकरता लोक तेथे आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तेथे आहे असे यहूदी लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशूकरता नाही तर ज्या लाजराला त्याने मेलेल्यांतून उठवले होते त्यालाही पाहण्याकरता ते आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तितक्यात येशू तिथे आले आहेत हे कळल्यावर यहूदी लोकांचा समुदाय तिथे आला, तेव्हा केवळ त्यानांच नव्हे तर ज्याला येशूंनी मरणातून उठविले त्या लाजराला पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो तेथे आहे असे यहूद्यातील पुष्कळ लोकांस कळले आणि केवळ येशूकरता नाही, तर ज्याला त्याने मरण पावलेल्यातून उठवले होते त्या लाजरालाही आपण पाहावे म्हणून ते आले.