John 13:36 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात?” येशूने उत्तर दिले, “जेथे मी जातो तेथे तुझ्याने येता येणार नाही. पण नंतर तू माझ्यामागे येशील.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पेत्राने येशूला विचारले, “प्रभो, आपण कोठे जात आहात?” येशूने उत्तर दिले, “मी जेथे जातो, तेथे तुला आता माझ्यामागे येता येणार नाही, पण तू नंतर येशील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता?” येशूने उत्तर दिले, “मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्यामागे येता येणार नाही; पण तू नंतर येशील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिमोन पेत्राने त्यांना विचारले, “प्रभूजी, आपण कुठे जाणार आहात?” येशूंनी उत्तर दिले, “मी जिथे जातो, तिथे आता तुला माझ्यामागे येता येणार नाही, परंतु नंतर तू माझ्यामागे येशील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता?” येशूने त्यास उत्तर दिले, “मी जाईन तिकडे, आता, तुला माझ्यामागे येता येणार नाही; पण नंतर तू येशील.”