John 15:24 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी त्या लोकांमध्ये अशा गोष्टी केल्या ज्या दुसऱ्या कोणीही केल्या नाहीत. मी जर त्या गोष्टी केल्या नसत्या, तर पापबद्धल ते दोषी ठरले नसते, पण आता त्यांनी ते चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही त्यांनी माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जी कृत्ये दुसऱ्या कोणी केली नाहीत, ती मी त्यांच्यामध्ये केली नसती, तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांनी माझी कृत्ये पाहिली आहेत तरी ते माझा व माझ्या पित्याचाही द्वेष करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जी कृत्ये दुसर्‍या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांनी मला व माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे कोणीही केले नाही, ते कार्य मी त्यांच्यामध्ये केले नसते, तर ते दोषी समजले गेले नसते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, त्यांनी आम्हा दोघांचा, म्हणजे माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जी कामे दुसर्‍या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. पण आता त्यांनी मला आणि माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे.