John 15:26 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पित्यापासून मी साहाय्यकर्ता पाठवीन, साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. तो पित्यापासन येतो. जेव्हा तो येतो तेव्हा तो माझ्याविषयी सांगतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कैवारी, म्हणजे पित्याकडून निघणारा सत्याचा आत्मा, मी पित्याकडून तुमच्याकडे पाठवीन. तो येईल तेव्हा माझ्याविषयी साक्ष देईल
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुमच्याकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जेव्हा कैवारी येईल, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवेन, तो सत्याचा आत्मा जो पित्याकडून येतो—तो माझ्याविषयी साक्ष देईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.