John 16:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या शिष्यांतील काही जण एकमेकांस म्हणाले, “तो असे म्हणतो याचा अर्थ काय? थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही. मग थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. कारण मी पित्याकडे जात आहे!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे ऐकून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांना म्हणाले, “‘थोडा वेळ मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, कारण मी पित्याकडे जात आहे’, असे जे तो म्हणाला त्याचा अर्थ काय?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांना म्हणाले, “हा आम्हांला, ‘थोड्या वेळाने मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ शिवाय, ‘कारण मी पित्याकडे जातो,’ असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावरून, त्यांचे काही शिष्य एकमेकास विचारू लागले, “मी पित्याकडे जातो म्हणून थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल याचा अर्थ काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांस म्हणाले, “हा आम्हास, ‘थोड्या वेळाने मी तुम्हास दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ शिवाय, ‘कारण मी पित्याकडे जातो.’ असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय?”