John 16:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशूने पाहिले की, याविषयी त्यांना काही विचारायचे आहे. म्हणून तो त्यांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांना हे विचारीत आहात काय की, जेव्हा मी म्हणालो, ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, आणि मग थोडया वेळाने तुम्ही मला पाहाल?’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याला काही विचारावे असे त्यांच्या मनात आहे, हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “थोडा वेळ मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, हे जे मी म्हणालो, त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “‘थोड्या वेळाने मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ हे जे मी म्हणालो, त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना याविषयी काही विचारायचे आहे हे ओळखून येशूंनी त्यांना म्हटले, “मी तुम्हाला जे सांगितले होते, त्याबद्दल तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय की ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे, हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “मी म्हणले की, थोड्या वेळाने, तुम्हास मी दिसणार नाही आणि पुन्हा, थोड्या वेळाने, तुम्ही मला पहाल, याविषयी एकमेकांना विचारीत आहात काय?