John 16:25 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“जरी मी तुम्हांला रूपकाच्या भाषेत या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी मी आणखी अशा प्रकारची भाषा बोलणार नाही, पण साधेपणाने पित्याविषयी तुम्हांला सांगेन.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या गोष्टी मी तुम्हांला अप्रत्यक्षपणे सांगितल्या आहेत. ह्यापुढे मी तुमच्याबरोबर अप्रत्यक्षपणे बोलणार नाही, तर तुम्हांला पित्याविषयी उघडपणे सांगण्याची घटका जवळ येत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या गोष्टी मी तुम्हांला अन्योक्तीने सांगितल्या आहेत; मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हांला उघड सांगेन अशी घटका येत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जरी मी अलंकारिक रीतीने बोलत आहे, तरी अशी वेळ येईल की मी तुम्हाबरोबर अशा भाषेमध्ये आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हाला स्पष्टरीतीने सांगेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या गोष्टी मी तुमच्याशी दाखल्यात बोललो आहे; पण जेव्हा मी तुमच्याशी दाखल्यात बोलणार नाही पण मी तुम्हास उघडपणे पित्याविषयी सांगेन अशी वेळ येत आहे.