John 16:30 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता आम्हांला पक्के समजले की, तुम्हांला सर्व माहीत आहे. आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारण्याचीसुद्वा आवश्यकता नाही, यामुळे आमचा विश्वास बसतो की, आपण देवापासून आला आहात.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आता आम्हांला समजले आहे की, आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपल्याला प्रश्न विचारावेत ह्याची गरज नाही, ह्यावरून आपण देवाकडून आला आहात, असा आम्ही विश्वास धरतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता आम्हांला कळले आहे की, आपल्याला सर्वकाही कळते, आणि कोणी आपणाला विचारावे ह्याची आपणाला गरज नाही; ह्यावरून आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता आम्हास कळले की, तुम्हाला सर्वगोष्टी ठाऊक आहेत, म्हणून कोणासही आपणास प्रश्न विचारण्याची गरज नाही. यावरून आपण परमेश्वरापासून आला आहात असा आम्ही विश्वास ठेवतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता आम्हास कळले आहे की, आपल्याला सर्वकाही कळते आणि कोणी आपल्याला विचारावे याची आपणाला गरज नाही. यावरुन आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो.”