John 16:32 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण अशी वेळ येत आहे आणि आली आहे, जेव्हा तुमची पांगापांग होईल. प्रत्येक जण त्याच्या घरी जाईल. तुम्ही मला एकटेच सोडाल, तरीही मी एकटा नाही कारण माझा पिता मजबरोबर आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे की, तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल. तरी मी एकटा नाही कारण पिता माझ्याबरोबर आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल; तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशी वेळ येत आहे आणि आलीच आहे की तुमची पांगापांग होईल व तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी परत जाल. तुम्ही मला एकटे सोडाल, तरीसुद्धा मी एकटा नसेन, कारण माझे पिता मजबरोबर आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, अशी वेळ येत आहे किंबहुना आली आहे की, तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपआपल्या घरी जाल व मला एकटे सोडाल; पण मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.