John 16:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुम्हांला आता या गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणून या गोष्टी घडण्याची वेळ येईल. तेव्हा मी तुम्हांला त्यांच्यविषयी सावध केले होते हे तुमच्या लक्षात येईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु मी तुम्हांला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, त्यांची वेळ आली म्हणजे त्या मी सांगितल्याची तुम्हांला आठवण होईल. ह्या गोष्टी मी आधीपासूनच तुम्हांला सांगितल्या नाहीत, कारण आतापर्यंत मी तुमच्याबरोबर होतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुम्हांला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, त्या घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हांला सांगितल्या होत्या ह्याची तुम्हांला आठवण व्हावी. ह्या गोष्टी मी प्रारंभापासून तुम्हांला सांगितल्या नाहीत; कारण मी तुमच्याबरोबर होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुम्हाला हे सांगत आहे, ते यासाठी की जेव्हा ते घडेल, तेव्हा तुम्हाला आठवेल की मी आधी तुम्हाला त्यासंबंधी इशारा दिला होता. मी या गोष्टी यापूर्वी तुम्हाला सांगितल्या नाहीत, कारण मी प्रत्यक्ष तुम्हाबरोबर होतो,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, ती घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हास सांगितल्या होत्या याची आठवण व्हावी. या गोष्टी मी तुम्हास, प्रारंभापासून, सांगितल्या नाहीत, कारण मी तुमच्याबरोबर होतो.