John 17:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे म्हणून तू मला दिलेल्या वैभवात मी त्यांना सहभागी केले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू जो गौरव मला दिला आहेस तो मी त्यांना दिला आहे, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही जे गौरव मला दिले ते मी त्यांना दिले, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू जे गौरव मला दिले आहे, ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे;