John 18:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग शिमोन पेत्र, ज्याच्याकडे तलवार होती, त्याने ती बाहेर काढली व मुख्य याजकाच्या सेवकाचा कान कापला (सेवकाचे नाव मल्ख होते)
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिमोन पेत्राजवळ तलवार होती. ती त्याने उपसून उच्च याजकांच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिमोन पेत्राजवळ तलवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला; त्या दासाचे नाव मल्ख होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शिमोन पेत्राजवळ तरवार होती, ती तरवार उपसून त्याने महायाजकाच्या दासावर वार केला व त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शिमोन पेत्राजवळ तलवार असल्याने त्याने ती उपसली व महायाजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते.