John 18:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला. म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन तेथे कामावर असणाऱ्या मुलीला सांगून पेत्राला आत आणले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता म्हणून जो दुसरा शिष्य उच्च याजकांच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु पेत्राला बाहेर दाराजवळ थांबावे लागले. तो दुसरा शिष्य, ज्याला मुख्य याजकाची ओळख होती, तो परत आला व दारावर राखण ठेवणार्या दासीशी बोलला व त्यांनी पेत्राला आत आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण पेत्र बाहेर, दाराशी उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले.