John 18:25 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिमोन पेत्र शेकत असता, त्याला विचारले गेले, “तू त्याच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?” त्याने ते नाकारले, “मी नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिमोन पेत्र अजूनही शेकत उभा राहिला होता. त्याच्याबरोबर शेकत उभ्या असलेल्या लोकांनी त्याला विचारले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” परंतु तो म्हणाला, “मी नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. त्याला इतर लोक म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” तो नाकारून बोलला, “मी नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दरम्यान, इकडे शिमोन पेत्र अजूनही शेकोटीजवळ शेकत उभा असताना त्यांनी त्याला विचारले, “तू खरोखर त्यांच्या शिष्यांपैकीच एक नाहीस का आहेस ना?” पेत्र नाकारून म्हणाला, “मी तो नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता; त्यास इतर म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” त्याने नाकारले व म्हटले, “मी नाही.”