John 18:3 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा शिपायांची तुकडी, मुख्य याजकाचे काही अधिकारी, परुशी यांना वाट दाखवीत यहूदा तेथे बागेत आला. ते मशाल, कंदील आणि हत्यारे घेऊन आले होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा सैनिकांची तुकडी आणि मुख्य याजक व परुशी ह्यांच्याकडच्या रक्षकांसह यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परूशी ह्यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहूदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा सैनिकांची एक तुकडी, महायाजक आणि परूश्यांकडील अधिकाऱ्यांना वाट दाखवित यहूदाह त्यांना बागेत घेऊन आला. त्यांच्याजवळ मशाली, कंदिले व हत्यारे होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक लोक व परूशी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर, दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन यहूदा तेथे आला.