John 19:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पिलात त्या यहूद्यांना म्हणाला, “पहा हा तुमचा राजा.” यहूदी ओरडले, “त्याला घेऊन जा! त्याला घेऊन जा! आणि वधस्तंभावर खिळून मारा!” पिलाताने त्यांना विचारले, “मी तुमच्या राजाला वधस्तंभी द्यावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हांला कैसराशिवाय दुसरा कोणी राजा नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते ओरडले, “त्याला ठार करा, ठार करा, त्याला क्रुसावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला क्रुसावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “कैसरवाचून आमचा कोणी राजा नाही!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावरून ते ओरडले, “त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा!” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “कैसरावाचून आम्हांला कोणी राजा नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला येथून न्या! त्याला येथून न्या! त्याला क्रूसावर खिळा!” तेव्हा पिलाताने विचारले, “तुमच्या राजाला मी क्रूसावर खिळावे काय?” त्यावर मुख्य याजक म्हणाले, “कैसराशिवाय आम्हाला दुसरा राजा नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावरुन ते ओरडले, “ह्याला संपवून टाका, त्यास वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हास कैसराशिवाय राजा नाही.”