John 19:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती पाटी भाषेत लिहिली होती. पुष्कळ यहूदी लोकांनी ती पाटी वाचली, कारण येशूला जेथे वधस्तंभावर देण्यात आले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते. तसेच ते लॅटीन, ग्रीक, आरामी भाषेतही होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूला क्रुसावर खिळले ते स्थळ शहराच्या जवळ होते म्हणून पुष्कळ यहुदी लोकांनी ती पाटी वाचली. ती हिब्रू, लॅटिन व ग्रीक ह्या भाषांत लिहिली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूला वधस्तंभावर खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमी व हेल्लेणी ह्या भाषांत लिहिली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनेक यहूद्यांनी हे पत्रक वाचले, कारण येशूंना ज्या ठिकाणी क्रूसावर खिळले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते आणि क्रूसावरील लेख हा हिब्रू, लॅटिन व ग्रीक भाषांमध्ये लिहिलेला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूला वधस्तंभावर खिळले होते ते ठिकाण नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी तो फलक वाचला. तो इब्री, रोमी व ग्रीक भाषांत लिहिला होता.