John 19:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहुद्यांच्या मुख्य याजकांनी पिलाताला विरोध केला. ते म्हणाले, ‘यहूद्यांचा राजा’ असे लिहू नका, ‘तर हा मनुष्य यहूदी लोकांचा राजा आहे’ “असा दावा करतो, असे लिहा.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मुख्य याजक पिलातला म्हणाले, “‘यहुदी लोकांचा राजा’ असे लिहू नका, तर ‘मी यहुदी लोकांचा राजा आहे, असे त्याने म्हटले’, असे लिहा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यहूद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका, तर ‘मी यहूद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले,’ असे लिहा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मुख्य याजक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका” तर “मी यहूद्यांचा राजा आहे, असे या मनुष्याने म्हटले होते तसे लिहा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक लोक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका तर याने म्हणले ‘मी यहूद्यांचा राजा आहे’ असे लिह.”