John 19:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळले, तेव्हा त्यांनी त्याची वस्त्रे घेतली. आणि चौघात ती वाटून घतली. फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा पोशाख वरपासून खालपर्यंत पूर्ण विणलेला होता. त्याला शिवलेले नव्हते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिपायांनी येशूला क्रुसावर टांगल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले. त्यांनी झगाही घेतला. त्या झग्याला शिवण नव्हती. तो वरपासून खालपर्यंत अखंड विणलेला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एकेका शिपायाला एकेक वाटा असे चार वाटे केले; त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सैनिकांनी येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांनी त्यांची वस्त्रे घेतली आणि एकाएका सैनिकाला एक असे त्याचे चार विभागामध्ये वाटप केले, फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा अंगरखा शिवलेला नसून वरपासून खालपर्यंत संपूर्ण विणलेला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यावर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले; आणि झगाही घेतला. या झग्याला शिवण नव्हती; तो वरपासून सरळ विणलेला होता.