John 19:31 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो तयारीचा दिवस होता व दुसऱ्या दिवशी विशेष शब्बाथाचा दिवस होता. शब्बाथ दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत अशी यहूदी लोकांची इच्छा होती. त्यांनी पिलाताला पाय तोडण्याची आणि शरीरे वधस्तंभावरून खाली घेण्याविषयी विचारले,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो साबाथच्या तयारीचा दिवस होता, साबाथ दिवशी शरीरे क्रुसावर राहू नयेत, कारण तो साबाथ महापवित्र दिवस होता, म्हणून त्यांचे पाय मोडावेत आणि त्यांना घेऊन जावे, अशी यहुद्यांनी पिलातला विनंती केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बाथ दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत (कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता), म्हणून त्यांचे पाय मोडावेत आणि त्यांना घेऊन जावे अशी यहूद्यांनी पिलाताला विनंती केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता क्रूसावर खिळलेल्यांची शरीरे दुसर्या दिवसापर्यंत लटकत राहू नयेत, अशी यहूदी पुढार्यांची इच्छा होती. कारण हा तयारीचा दिवस होता आणि दुसरा दिवस हा एक विशेष शब्बाथ होता. म्हणून त्यांचे पाय मोडण्याचा हुकूम द्यावा, अशी विनंती त्यांनी पिलाताला केली, मग त्यांची शरीरे उतरवून घेता येतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ दिवशी वधस्तंभावर शरीरे राहू नयेत, कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता म्हणून यहूद्यांनी पिलाताला विनंती केली की, त्यांचे पाय तोडून त्यांना काढून घेऊन जावे.