John 19:38 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर अरिमथाई येथील योसेफाने पिलातला येशूचे शरीर मागितले. योसेफ हा येशूचा शिष्य होता, पण गुप्त रीतीने, कारण त्याला यहूद्यांची भीति वाटत होती. पिलाताच्या परवानगीने तो आला व शरीर घेऊन गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर अरिमथाईकर योसेफ ह्याने पिलातला अशी विनंती केली की, त्याला येशूचे शरीर नेऊ द्यावे. यहुदी लोकांच्या भयामुळे तो येशूचा गुप्त शिष्य होता. पिलातने परवानगी दिल्यानंतर तो येशूचे शरीर घेऊन गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यानंतर अरिमथाईकर योसेफ ह्याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा एक शिष्य असून यहूद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता; आणि पिलाताने परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन त्याचे शरीर नेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर अरिमथियाकर योसेफाने येशूंचे शरीर पिलाताकडे मागितले. आता योसेफ येशूंचा एक गुप्त अनुयायी असून यहूदी पुढार्यांना भीत होता. पिलाताच्या परवानगीने, तो आला आणि येशूंचे शरीर घेऊन गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यानंतर, जो अरिमथाईकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर नेता यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा शिष्य असून पण यहूद्यांच्या भीतीमुळे गुप्त शिष्य होता, पिलाताने त्यास परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन येशूचे शरीर नेले.