John 19:40 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहूदी लोकांच्या प्रेत पुरण्याच्या रीतीप्रमाणे सुगंधित द्रव्यासहित तागांनी ते गुंडाळले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या दोघांनी येशूचे शरीर घेऊन त्याला यहुदी लोकांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्ये लावली व ते कापडात गुंडाळले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहूद्यांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्यांसहित तागाच्या वस्त्रांनी ते गुंडाळले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंचे शरीर घेऊन त्या दोघांनी ते सुगंधी द्रव्यासह तागाच्या वस्त्राने गुंडाळले. हे यहूद्यांच्या उत्तरक्रियेच्या रीतीप्रमाणे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहूद्यांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे त्यांनी ते सुगंधी मसाल्यांसहित तागाच्या वस्त्रात गुंडाळले.