John 2:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो वराला म्हणाला, “लोक नेहमी उत्तम द्राक्षारस पहिल्यांदा वाढतात. नंतर पाहुणे भरपूर प्याले म्हणजे मग लोक हलक्या प्रतीचा वाढतात. परंतु तू तर उत्तम द्राक्षारस अजून राखून ठेवला आहेस.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“प्रत्येक मनुष्य प्रथम उत्तम दर्जाचा द्राक्षारस वाढतो आणि लोक द्राक्षारस यथेच्छ प्याले म्हणजे नंतर साधारण दर्जाचा वाढतो. तू तर उत्तम द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो; तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“प्रत्येकजण उत्तम द्राक्षारस प्रथम वाढतो आणि पाहुणे पिऊन तृप्त झाले की, मग हलक्या प्रतीचा वाढतो; तुम्ही तर उत्तम द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास म्हटले, “प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग बेचव वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस.”