John 2:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
स्वर्गीय सामर्थ्याचे चिन्ह म्हणून येशूने केलेला हा पहिला चमत्कार होता. गालीलातील काना येथे येशूने हा चमत्कार केला. आणि येशूने आपली महानता दाखवून दिली. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने गालीलमधील काना येथे आपले हे पहिले चिन्ह करून आपले वैभव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूने गालीलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केला आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी गालीलातील काना येथे केलेले हे पहिले चिन्ह होते व त्याद्वारे आपले गौरव प्रकट केले आणि शिष्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने गालील प्रांतातील काना नगरात आपल्या अद्भुत चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.