John 2:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर येशू कफर्णहूम गावी गेला. येशूची आई, भाऊ व त्याचे शिष्य त्याच्यासोबत गेले. ते सर्व काही दिवस कफर्णहूमास राहिले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य कफर्णहूम येथे गेले व तेथे ते काही दिवस राहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले; परंतु तेथे ते फार दिवस राहिले नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर येशू आपली आई, भाऊ आणि शिष्य यांच्याबरोबर काही दिवस खाली कफर्णहूम येथे राहण्यास गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले; पण ते तेथे फार दिवस राहिले नाहीत.