John 2:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशू यरुशलेम येथील मंदिरात गेला. येशूला मंदिरात गुरे, मेंढ्या आणि कबुतरे विकणारी माणसे दिसली. काही माणसे मेज मांडून बसल्याचे त्याने पाहिले. ती माणसे लोकांना पैसे बदलून देण्याचा व्यापार करीत होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मंदिरात बैल, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि पैशाची देवघेव करणारे हे सारे बसलेले त्याला आढळले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि मंदिरात गुरे, मेंढरे, कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे त्यांनी मंदिराच्या अंगणात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि पैसे बदलून देणारे लोक यांना पाहिले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यास परमेश्वराच्या भवनात गुरे, मेंढरे आणि कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले आढळले.