John 2:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग लग्नसमारंभातील भोजनप्रमुखाने ते चाखून पाहिले, तर पाण्याचा द्राक्षारस झालेला होता. तो द्राक्षारस कोठून आला हे त्या माणसाला माहीत नव्हते. परंतु ज्या नोकरांनी ते पाणी नेले होते त्यांना तो द्राक्षारस कोठून आला होता हे माहीत होते. लग्नसमारंभाच्या भोजनप्रमुखाने वराला बोलाविले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
द्राक्षारस बनलेले ते पाणी भोजन- कारभाऱ्याने जेव्हा चाखले (तो द्राक्षारस कुठला आहे, हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या नोकरांना ठाऊक होते), तेव्हा भोजन-कारभारी वराला बोलावून म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
द्राक्षारस बनलेले पाणी भोजनकारभार्याने जेव्हा चाखले, (तो द्राक्षारस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणार्या चाकरांना ठाऊक होते), तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून म्हणाला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या भोजन प्रमुखाने द्राक्षारसात परिवर्तित झालेल्या पाण्याची चव पाहिली. तो द्राक्षारस कुठून आणला हे त्याला माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले होते त्यांना माहीत होते. म्हणून त्याने वराला बाजूला बोलावून म्हटले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
द्राक्षरस बनलेले पाणी? भोजनकारभार्याने जेव्हा चाखले आणि तो कुठला होता हे त्यास माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते, तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून,