John 20:26 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एक आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दार बंद होते तरी येशू आत आला व त्यांच्यामध्ये उभा राहिला. आणि म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग एका आठवड्यानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा खोलीत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एक आठवड्यानंतर शिष्य पुन्हा घरी असताना थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दारे बंद होती तरी येशू त्यांच्यामध्ये उभे राहून म्हणाले, “तुम्हाला शांती असो!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि पुन्हा, आठ दिवसानी, त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्याबरोबर होता; आणि दरवाजे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्हास शांती असो.”